व्यंजनांचें प्रकार (Vyanjananche Prakar)
१. स्पर्श व्यंजने
ज्या व्यंजनांचा उच्चार करताना फुफ्फुसातील हवा बाहेर टाकली जाते आणि त्या वेळी ती हवा जीभ, कंठ, दात आणि ओठ यांच्याशी स्पर्श करते त्या व्यंजनास स्पर्श व्यंजने म्हणतात.
'क् ... ते ... ख्' हि स्पर्श व्यंजने आहेत.
'क् ... ते ... ख्' हि स्पर्श व्यंजने आहेत.
२. अनुनासिक
ज्या व्यंजनांचा उच्चार नाकातून होतो त्यास 'अनुनासिक' व्यंजने म्हणतात.
३. कठोर व मृदू व्यंजने
जी व्यंजने उच्चारताना त्यांच्यांत तीव्रता दिसून येते त्यास 'कठोर व्यंजने' म्हणतात.
जी व्यंजने उच्चारताना त्यांच्यांत सौम्यता, कोमलता, आणि मृदुता दिसून येते त्यास 'मृदू व्यंजने' म्हणतात.
जी व्यंजने उच्चारताना त्यांच्यांत सौम्यता, कोमलता, आणि मृदुता दिसून येते त्यास 'मृदू व्यंजने' म्हणतात.
वर्ग | कठोर व्यंजने | मृदू व्यंजने | अनुनासिके |
क - वर्ग | क् ख् | ग् घ् | ङ् |
च - वर्ग | च् छ् | ज् झ् | ञ् |
ट - वर्ग | ट् ठ् | ड् ढ् | ण् |
त - वर्ग | त् थ् | द् ध् | न् |
प - वर्ग | प् फ् | ब् भ् | म् |
४. उष्मे - घर्षक
श् ष् स् यांस उष्मे किंवा घर्षक असे म्हणतात.
यांचा उच्चार करते वेळी जोराने उसासा बाहेर टाकला जातो. या वेळी घर्षण आणि घर्षणाने उष्णता निर्माण होते, म्हणून यास उष्मे घर्षक असे म्हणतात.
यांचा उच्चार करते वेळी जोराने उसासा बाहेर टाकला जातो. या वेळी घर्षण आणि घर्षणाने उष्णता निर्माण होते, म्हणून यास उष्मे घर्षक असे म्हणतात.
५. महाप्राण व अत्यल्प व्यंजने
'ह' या वर्णाचा उच्चार फुफ्फुसातील हवा जोराने बाहेर टाकून होतो, म्हणून त्यास महाप्राण असे म्हणतात.
अशा 'ह्' ला मिसळून तयार झालेल्या वर्णांस महाप्राण वर्ण असे म्हणतात.
महाप्राण वर्णाचे इंग्रजीत स्पेलींग केले असता त्या स्पेलींग मध्ये 'H' हे इंग्रजीतील वर्ण येते.
अशा 'ह्' ला मिसळून तयार झालेल्या वर्णांस महाप्राण वर्ण असे म्हणतात.
महाप्राण वर्णाचे इंग्रजीत स्पेलींग केले असता त्या स्पेलींग मध्ये 'H' हे इंग्रजीतील वर्ण येते.
अल्पप्राण | महाप्राण |
क् | क् + ह् = ख् |
च् | च् + ह् = छ् |
ट् | ट् + ह् = ठ् |
त् | त् + ह् = थ् |
प् | प् + ह् = फ् |
ग् | ग् + ह् = घ् |
ज् | ज् + ह् = झ् |
ड् | ड् + ह् = ढ् |
द् | द् + ह् = ध् |
ब् | ब् + ह् = भ् |
'ळ' हा स्वतंत्र वर्ण मनाला जातो.
'क्ष' आणि 'ज्ञ' ही जोडाक्षरे आहेत. त्यांची गणना आपण वर्णमालेत करत नाही. 'क्ष' ची फोड केली असता क् + ष् + अ = क्ष असे आपणास दिसून येईल आणि 'ज्ञ' ची फोड केली असता द् + न् + ग् + अ = ज्ञ असे आपणास दिसून येईल. म्हणून यांस जोडाक्षरे असे म्हणतात.

1 comments
Thanks for providing
ReplyDelete