Swift
"Look at sky we are not alone. The whole universe is friendly to us and give best to those who dream and work." -Dr. A. P. J. Abdul Kalam.

Search in this blog

स्वरांचे प्रकार (Swaranche Prakar)

१. संयुक्त स्वर
दोन स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना सयुंक्त स्वर म्हणतात.
उदा. अ + इ = ए, अ + ऐ = ई, अ + उ = ओ, आ + उ = औ.

उच्चारा नुसार पडलेले प्रकार
२. र्हस्व स्वर व दीर्घ स्वर
ज्या स्वरांचा उच्चार करताना त्यांचा उच्चार आखूड होतो त्यांस र्हस्व स्वर म्हणतात.
र्हस्व स्वर उच्चार करण्यास कमी वेळ लागतो.
ज्या स्वरांचा उच्चार करताना त्यांचा उच्चार लांब होतो त्यांस दीर्घ स्वर म्हणतात.
दीर्घ स्वर उच्चार करण्यास जास्त वेळ लागतो.
उच्चार करण्यास लागणाऱ्या वेळेला मात्रा म्हणतात. र्हस्व स्वर उच्चार काण्यास जो वेळ लागतो त्यास एक मात्रा म्हणतात. दीर्घ व सयुंक्त स्वर उच्चारण्यास दोन मात्रे लागतात.

उच्चारस्थाना नुसार पडणारे प्रकार
३. सजातीय व विजातीय स्वर
एकाच उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वारांस सजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ/आ, इ/ई, उ/ऊ, इ.
वेगवेगळ्या उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वारांस विजातीय स्वर म्हणतात.
उदा. अ/उ, इ/आ, उ/ए, इ.

You Might Also Like

3 comments

Flickr Images