Swift
"Look at sky we are not alone. The whole universe is friendly to us and give best to those who dream and work." -Dr. A. P. J. Abdul Kalam.

Search in this blog

वर्णांचे प्रकार (Varnache Prakar)

१. स्वर
वर्णमालेतील 'अ' पासून 'औ' पर्यंत बारा वर्णांना स्वर म्हणतात.
उच्चार करत असताना ओठांचा किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही अवयवांशी स्पर्श न होता जो ध्वनी मुखातून बाहेर पडतो त्यास स्वर म्हणतात.
स्वरांचे प्रकार

२. स्वरादी
वर्णमालेतील 'अं' आणि 'अः' हे दोन वर्ण स्वरादी आहेत. यात अनुस्वार ( ' ) आणि विसर्ग ( : ) हे दोन उच्चार आहेत. या अनुस्वार आणि विसर्ग या आधी स्वर येतात म्हणून यास स्वरादी असे म्हणतात.
उदा: आनंद - या शब्दातील 'न' या वर्णाच्या अगोदर अनुस्वार आला आहे.
अनुस्वार - ज्या शब्दातील उच्चार स्पष्ट व खणखणीत असतात त्यास अनुस्वार असे म्हणतात. (उंट, इंधन, गंगा, आंबा, इ. )
अनुनासिक - ज्या शब्दातील उच्चार अस्पष्ट आणि ओझरते असतात त्यास अनुनासिक असे म्हणतात. (देवांसाठी, सर्वांशी, लोकांना, इ. )
विसर्ग - विसर्ग म्हणजे श्वास सोडणे. विसर्गाचा उच्चार करताना 'ह्' या वर्णाचा किंचितसा सहभाग असतो.

३. व्यंजन
ज्या वर्णांचा उच्चार स्वरांच्या साहाय्या शिवाय पूर्ण होऊ शकत नाही त्या वर्णनांस व्यंजन असे म्हणतात.
मराठी भाषेत 'क्...ते ... ळ्' ही व्यंजने आहेत. व्यंजने अपूर्ण उच्चाराची आहेत हे दाखवण्यासाठी त्यांचा पाय मोडण्याची पद्दत आहे. जेव्हा आपण एखादे व्यंजन उच्चारतो त्या वेळी त्यात 'अ' हा स्वर मिसळून गेलेला असतो.
उदा. क् + अ = क, ख् + अ = ख, ग् + अ = ग, इ.
अक्षरे-अक्षरे म्हणजे पूर्ण उच्चारांचे वर्ण.
अ, आ, इ,... हे सारे स्वर पूर्ण उच्चारांची आहेत. क्, ख्, ग्,... ही व्यंजने अपूर्ण उच्चारांची आहेत. त्यात 'अ' हे स्वर मिसळून त्यांची क, ख, ग, ... अक्षरे होतात.
बाराखडी - व्यंजनात स्वर मिसळून त्यांची अक्षरे तयार होतात. प्रत्येक व्यंजनात अ, आ, इ, ई,... हे १० स्वर आणि अनुस्वार व विसर्ग यांची मिळून बारा अक्षरे तयार होतात त्यास 'बाराखडी' असे म्हणतात.
व्यंजनांचें प्रकार

You Might Also Like

0 comments

Flickr Images